जामनेर ( प्रतिनिधी ) – जामनेर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक 17 एप्रिल रोजी होणार आहे. 2022 ते 2027 या पाच वर्षांसाठीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत विद्यमान संचालक मंडळाचे सहकार पॅनल आहे. विद्यमान संचालक मंडळ आमदार गिरीश महाजन व राष्ट्रवादीचे नेते ईश्वरबाबू जैन यांच्या नेतृत्वात काम करीत आहे.
मागील 50 वर्षात संस्था 100 टक्के वसुलीस पात्र झाली नव्हती. परंतु विद्यमान संचालक मंडळाच्या कामगिरीमुळे हे साध्य झाले. संचालक मंडळात यंदाच्या निवडणुकीत थोडेफार फेरफार करून पुन्हा हेच संचालक मंडळ यावे यासाठी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले .परंतु काही लोकांनी संस्थेला निवडणुक खर्चात टाकण्यासाठी ही निवडणूक लादली.
सहकार पॅनेलच्यावतीने आमदार गिरीश महाजन आणि माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी आवाहन केले आहे की सभासदांनी संस्थेला नुकसानमध्ये टाकणाऱ्या लोकांना धडा शिकवून सहकार पॅनलच्या उमेदवारांना विजयी करावे.
सहकार पॅनेलला शेतकरी पॅनलने आव्हान दिले आहे. 13 पैकी सहकार पॅनलच्या 2 जागा बिनविरोध झाल्या आहे .आता 11 जागांसाठी निवडणुक होत आहे शेतकरी पॅनल 10 जागेवर उमेदवार मिळाले सर्वसाधारण गटात शेतकरी पॅनलला 1 उमेदवार मिळाला नाही सहकार पॅनलमध्ये भाजप , प्रहार , काँग्रेस तर शेतकरी पॅनलमध्ये राष्ट्रवादी व शिवसेना यांचा समावेश आहे. सहकार पॅनलच्या वतीने गोपाल पाटील आणि जगन्नाथ सुरडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सहकार पॅनेलचे सर्वसाधारण मतदारसंघातील उमेदवार अ.जावेद, राजेंद्र भोईटे, देवराम चौधरी,प्रदीप गायके, ज्ञानेश्वर माळी, पांडुरंग माळी, शंकर राजपूत, विजय सोनवणे हे असून महिला राखीव मतदारसंघात माधुरी लखोटे आणि स्नेहांकिता लोखंडे या उमेदवार आहेत. भटक्या विमुक्त मतदार संघातून गोविंदा धनगर हे उमेदवार आहेत.