चोपडा ( प्रतिनिधी ) – चोपडा शहरातील एका भागात राहणाऱ्या महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याच्या घटना घडली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा शहरातील एका भागात २३ वर्षीय महिलाही आपल्या परिवारासह राहायला आहे. १२ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता महिलाही घरी एकटी असताना तिच्या घरात घुसून शेख अलीम शेख इसामुद्दीन ( वय – २७ ) हा तिचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी महिलेने चोपडा शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी शेख अलीम शेख इसामुद्दीन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप भोई करीत आहे.