जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील माहेर असलेल्या विवाहितेचा कौटुंबिक वादातून छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या सहा जणाविरुद्ध शनिवारी नशिराबाद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून, नशिराबाद येथील माहेर असलेल्या सालेहा मोहसीन मणियार ( वय – २६ ) यांचा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील मोहसीन खान रऊफ खान मणियार यांच्याशी विवाह झाला आहे. पहिल्या पत्नीशी कुठलेही संबंध ठेवू नये , यासाठी सालेहा यांनी पती मोहसीन यांना विरोध केला. या कारणावरून पतीसह सासरच्या मंडळींनी सालेहा यांना शिवीगाळ करत शारीरिक व मानसिक छळ केला. छळ असह्य झाल्याने सालेहा ह्या माहेरी निघून आल्या. याप्रकरणी सालेहा यांनी शनिवारी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पती मोहसीन, सासरे रऊफ खान मणियार, सासू नजमा बी खान मणियार, जेठ मुश्ताक खान मणियार, नणंद फरजाना बी फारुख मणियार व मोहम्मद फारुख अब्दुल सत्तार सर्व रा.शिंदखेडा, जिल्हा धुळे या सहा जणांविरोधात नशीराबाद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल महाजन हे करीत आहे.