नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर ईदच्या निमित्ताने सलमानचा बहुचर्चित सिनेमा ‘राधे-युअर मोस्ट वॉन्टेड भाई प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहून नेहमीप्रमाणेच चाहत्यांनी भाईजानवर कौतुकाचा नुसता वर्षाव केला आहे. तर दुसरीकडे मात्र टीकाकारांनी सलमानला चांगलाच झोडपून काढला आहे. खरं तर सलमानचा सिनेमा कोणताही असो.. त्यातली त्याची एंट्री हा त्याच्या चाहत्यांसाठी नेहमीच कौतुकाचा भाग राहिला आहे. तास यावेळी काही वेगळं झालं नाही. सलमानच्या चाहत्यांनी नेहमीप्रमाणे त्याच्या एंट्रीचे कौतुक केलेच पण या व्यक्तिरिक्त जे प्रेक्षक हा सिनेमा पाहत होते त्यांच काय..? त्यांना आवडली का सलमानची एन्ट्री. तर काहीही गोल गोल न फिरवता सांगायचं झालं तर सोशल मीडियावर फिरणाऱ्या मिम्सवरून सलमानच्या एन्ट्रीने काय जादू केलीये हे सगळ्यांनाच कळेल. चक्क सिनेमातील एन्ट्री सलमानवर मिम्स बनविण्याचे कारण ठरले आहे. हे व्हायरल होणारे मिम्स पाहून एकतर तुम्ही हसाल नाहीतर थक्क व्हाल.
‘राधे’ हा ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सिनेमागृह या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला आहे. ज्या ठिकाणी लॉकडाउन नाही त्या ठिकाणी हा चित्रपट सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहता येईल. मात्र उर्वरीत चाहत्यांना ओटीटी प्लॅटफॉर्मचाच आधार घ्यावा लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील प्रेक्षकांसाठी हा चित्रपट ओटीटीवरच उपलब्ध आहे. त्यामुळे अनेकांनी हा चित्रपट झी५ आणि झी प्लेक्स सारख्या ओटीटीवर पाहिला आहे.
दरम्यान सलमानच्या चाहत्यांनी पहिल्याच दिवशी सिनेमा पाहण्यासाठी इतके लॉगिन केले कि अगदी साईट्स क्रॅश झाल्या. तर दुसरीकडे सलमानच्या चित्रपटावर बहिष्कार टाकणाऱ्या हॅशटॅगने ट्रेंडिंग मार्केट जिंकले आहे. तर याहीपेक्षा तिसरं म्हणजे चक्क भाईजान स्वतःच्याच चित्रपटासाठी सोशल मीडियावर गमतीचा विषय झाला आहे. आता या सिनेमाचं नेमकं काय होणार ते सलमान, एस.के.एफ. प्रोडक्शन आणि प्रेक्षकच सांगू शकतात.
सध्या ‘राधे’ सिनेमावर विविध प्रकारच्या संमिश्र पद्धतीच्या प्रतिक्रिया मिळत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार समीक्षकांना हा सिनेमा काही फारसा भावलेला नाही. तर चित्रपट समीक्षक तरन आदर्श यांनी चित्रपटाला केवळ २ स्टार चे लो रेटिंग दिले आहे. सोबतच हा चित्रपट केवळ सलमानच्या चाहत्यांसाठी आहे असेही म्हटले आहे.
हा चित्रपट पाहून सलमानच्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहेच. पण सोबत टीकाकारांनी त्याला चांगलाच ट्रोल केला आहे. एकाने लिहिले आहे, मी एकटा का झेलू? तुम्हीपण माझ्यासोबत दुःख साहा.. टर्मिनेटर एंट्री.
तर कुणी इतर कलाकारांचे फोटो वापरून किंवा एखाद्या चित्रपटाच्या सीनचा वापर करून मिम्स तयार केले आहे. एकंदर हे सगळं पाहता सलमानची जादू आता फिकी झाली का काय?? असे काहीसे वाटू लागले आहे.