नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशातील कोरोना परिस्थिती वर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या वर निशाणा साधला. देशात पंतप्रधान आहेत. केंद्रीय गृहमंत्री आहेत. पण ते गायब आहेत. त्यामुळे देश रामभरोसे चालला आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी मोदी सरकार वर टीकास्त्र सोडलं. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राऊतांना टोला लगावला आहे.
राऊतजी एवढे अगतिक का? घरबसल्या आभासी कारभार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारला असे आडून टोमणे मारणे त्यांच्यातील राजकारण्याला शोभत असले तरी त्यांनी आपल्यातील पत्रकाराला जाब विचारला पाहिजे. राज्याचा आंधळा कारभार पाहण्याएवढा डोळसपणा तुमच्यातील पत्रकाराने तरी दाखविला पाहिजे.
राऊतसाहेब, डोळे उघडा… देशात कोरोनाचा हाहाःकार उडाला त्यात सर्वाधिक महाराष्ट्राचा वाटा आहे हे कस विसरून चालेल? या कठिण परिस्थितीत जनतेला मदत करण्याऐवजी मंत्री अधिकाऱ्यावरून भांडत आहेत, पीआर कंत्राट दिली जात आहेत. किती यादी सांगू?