नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – आसाम मध्ये एक मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली आहे. आसाममधील नागाव जिल्ह्यात जंगली भागात वीज पडून तब्बल 18 हत्तींचा मृत्यू झाला आहे. याबाबत वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी मुख्य वन संरक्षक अमित सहाय यांनी सांगितले की ‘बुधवारी रात्री काठीयाटोली रेंजच्या कुंडली वनपरिक्षेत्रातील टेकडीवर वीज कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे.
पुढे बोलताना त्याने सांगितलं की, ‘आमची टीम गुरुवारी दुपारी या जंगलात पोहोचली इथं दोन कळपामध्ये हत्तीचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यापैकी 14 हत्तींचे मृतदेह टेकडीच्या माथ्यावर आढळले आहेत तर डोंगराच्या खालच्या भागात चार मृतदेह सापडले आहेत अशी माहिती आम्ही सहाय यांनी दिली आहे. याबाबत बोलताना वनमंत्री परिमल सुक्लाबैद्य म्हणाले की, ‘या हातींचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला असा प्राथमिक तपासणीत आढळून आला आहे नेमकं कारण काय हे शवविच्छेदनानंतर कळू शकेल. वनमंत्री परीमल सुक्लाबैद्य हे शुक्रवारी घटनास्थळाचा पाहणी करतील. बुधवारी रात्री झालेल्या विजेच्या कोसळण्यामुळे हा त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. परंतु शुक्रवारी शवविच्छेदनानंतर खऱ्या कारणांची माहिती मिळू शकेल अशीही माहिती प्रधान मुख्य वनसंरक्षक अमित सहाय यांनी दिली आहे.