नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – रशियातून आलेल्या स्पुतनिक या लसीची किंमत जाहीर करण्यात आली आहे. रशियातून आयात केलेली ही लस भारतात 995.40 रुपयांना प्रति डोस मिळणार आहे. भारतात स्पुतनिक लस आयात करणारी कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने ही माहिती दिली
ही लस 91.6 टक्के परिणामकारक आहे. रशियातून आयात केलेल्या या स्पुतनिक व्ही लसीची किंमत 948 रुपये प्रति डोस आहे. परंतू त्यामध्ये 5 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. यामुळे या लशीची किंमत 995.4 रुपये होत आहे.
पुढच्या आठवड्यापासून ही लस बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्राने गुरुवारी दिली. विविध राज्यांत लसीची कमतरता दिवसेंदिवस वाढत गेली आणि लसीकरणासाठी निर्बंध आणण्यात आले.