चोपडा (प्रतिनिधी) – शहरातील मुख्य रस्त्यावरील लक्ष्मी ज्वेलर्स या सोन्याचांदीचे दुकानाचे शटर कापून ३ किलो २०० ग्राम चांदी घेऊन चोरटे पसार झाले आहे. धाडसी चोरीमुळे सराफ व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चोरटयांनी अमळनेर येथे आधी दुकान फोडले, नंतर चोपड्यात आल्याचे दिसत आहे. तसेच, चोरीसाठी अमळनेर येथीलच कार चोरल्याचे दिसून येत आहे.
चोपड्यातील मुख्य रस्त्यावर असणारे लक्ष्मी ज्वेलर्स येथे सकाळी ३ वाजून ४ मिनिटांनी चोरटे दुकानाजवळ आले. ३ वाजून १५ मिनिटांनी चोरी करून निघाल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे. शटर हे कटरने कापले आहे. दुकानामध्ये दोन चोरटे आत गेले. तीन चोरटे बाहेर उभे होते. दुकानाचे मालक हेमंत पूखराज जैन यांनी पोलिसांना माहिती दिली आहे. चोरी झाली त्यावेळी आवाजाने रहिवाशी जागे झाले असता त्यांनी आरडाओरड केली. चोरटे घटनास्थळावरून पसार झाले.
चोरट्यांनी दुकानातून दोन ते अडीच किलो चांदीचे वस्तू चोरी केली आहे, असे दुकानाचे मालक हेमंत जैन यांनी सांगितले. घटनास्थळी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील हे घटनास्थळी पोहोचले होते. सीसीटीव्हीनुसार चोरटे ज्या व्हगनार कार मध्ये आले त्याचा नंबर एमएच ०९ एक्यू १५५९असा होता. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी चोपडा शहरातील सर्वदूर नाकाबंदी केली आहे वाहनांची कसून चौकशी व तपासणी कराण्याचे सबधितांना आदेश दिले आहेत.तसेच हे चोरटे रात्रभर कुठे होते. म्हणून शहरातील लॉज वर सुध्दा चेक करण्याचे काम सकाळ पर्यंत सुरू होते. चोपड्यात लक्ष्मी ज्वेलर्स वर चोरी करण्यासाठी चोरट्यांनी वापरलेली व्हगणार गाडी ही अमळनेर येथून चोरल्याचे दिसत आहे. त्याच गाडीने त्यांनी अमळनेर येथे सुद्धा चोरी केली आहे.