जळगाव ( प्रतिनिधी ) – दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता 12 वी आयएससी व इयत्ता 10 वी आयसीएसईचा निकाल जाहिर झाला. यात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सोळा वर्षापासून 100 टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली. अनुभूती स्कूलमधून 12 वीच्या काॕकॉमर्स Commerce शाखेतून हेमंत अग्रवाल 93.25 टक्के तर विज्ञान शाखेतून प्रियम संघवी 89 टक्के गुणांसह प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेत. तर इयत्ता दहावीत मती भंडारी ही 92.80 टक्के गुणांसह प्रथम आली. पहल अग्रवाल ही विद्यार्थीनी 92.40 टक्क्यांसह द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेत.
अनुभूती निवासी स्कूलमधून दहावीसाठी 30 तर बारावीसाठी 18 विद्यार्थी परिक्षेत सहभागी झाले होते. अनुभूती स्कूलला एज्युकेशन वर्ल्ड दिल्ली व एज्युकेशन टुडे बेंगलूर या देशातील शिक्षण क्षेत्रात नामांकित रेटिंग एजन्सींनी यावर्षी महाराष्ट्रातून पहिला क्रमांक तर संपूर्ण भारतामध्ये अग्रस्थानी नामांकित केले आहे.
संस्थापक भवरलालजी जैन यांनी भारतीय संस्कृती पुढच्या पिढीला संस्कारीत व्हावी, एकमेकांमधील निर्भरता वाढावी, आंत्रपिनर्स निर्माण व्हावे यादृष्टीने अनुभूती निवासी स्कूल ही अनुभवाधारीत शिक्षण देणारी सीआयसीएसई या पॅटर्नची खान्देशातील एकमेव शाळा आहे. सामाजिक जाणिवेसह संवेदनशील नागरीक घडावे यासाठी विद्यार्थ्यांवर शाळेत पाचवी पासूनच विशेष लक्ष दिले जाते. शालेय अभ्यासक्रमाच्या शिक्षणासमवेत विद्यार्थ्यांना उद्योजक संस्कार दिले जाते. यासाठी जागतिक पातळीवरच्या विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. विद्यार्थ्यांना नव दिशा मिळावी यासाठी वर्षभर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त नियोजन अनुभूती निवासी स्कूलतर्फे केले जाते. अनुभूती स्कूलचे विद्यार्थी पुढील शिक्षणानंतर निवडलेल्या क्षेत्रांमध्ये उत्तमरित्या आपले योगदान देत आहे. हेच अनुभूती स्कूलच्या यशाचे गमक असून विविध क्षेत्रात विद्यार्थी यश संपादित करीत आहे.
ग्रीनस्कूल म्हणून ख्याती असलेल्या या स्कूलमध्ये वर्षभर विद्यार्थ्यांसाठी विविध गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविले जातात. अनुभूती स्कूलमध्ये विद्यार्थ्यांवरील व्यक्तिगत लक्ष, प्रशस्त ग्रंथालय, तज्ज्ञ शिक्षकांसह विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्याकडून अभ्यासाबरोबरच छंद जोपासले जातात. यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास होण्यास मदत होते. वर्षभर शिक्षक व शिक्षकतेतर सहकाऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना हे यश प्राप्त झाले. अनुभूती स्कूलच्या संचालक मंडळातील श्री. अशोक जैन, श्री. अतुल जैन, सौ. निशा अनिल जैन व प्राचार्य देबासिस दास यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे.
Anubhuti School’s ISC 2023 Class 12 Topper’s Name, Photo and Percentage
1) Hemant Agrawal 93.825% Topper in Commerce
2) Priyam Sanghvi 89 % Topper in Science
Anubhuti School’s ISC 2023 Class 10 Topper’s Name
1) Mati Bhandari 92.80$