जामनेर् (प्रतिनिधी) – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जामनेर शाखेची पाक्षिक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने रमेश एकनाथ पाटील यांचे हस्ते महाराजांना पुष्पमाला अर्पण करण्यात आली. शाखेच्या सभासदांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
सुरूवातीला शाखेचे प्रधान सचिव बी.आर. पाटील यांनी प्रास्ताविक करून स्वराज रक्षक संभाजी महाराजांच्या कार्याची माहिती दिली. नंतर पाक्षिक बैठकीत वैचारिक लेख, संघटना बांधणी, चमत्कार सादरीकरण, चालू घडामोडी, मागील कामाचा आढावा, पुढील नियोजन या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष नाना लामखेडे यांनी सभासदांचे उद्बोधन केले.
जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बो-हाडे यांचेसह शाखा कार्याध्यक्ष भीमराव दाभाडे, रामदास सोनवणे, मनीषा निकम, निर्मला बाबूराव पाटील, शोभा बो-हाडे, संदिपकुमार बाविस्कर, पंडित पाटील, हरी भगवान पाटील, हरी तापीराम पाटील हे सदस्य उपस्थित होते.