जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातून गुरांची चोरी करून त्यांची विल्हेवाट लावणारी ४ चोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने आज धुळे येथून पकडून अमळनेरला आणली आहे
जिल्हात काही दिवसात गुरे चोरीचे गुन्हे घडल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि किरणकुमार बकाले यांनी पोउनि सुधाकर लहारे, पोहेकॉ अश्रफ शेख , सुधाकर अंभोरे, चापोहेकॉ विजय चौधरी यांचे पथक तयार करुन तपासाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती
पो नि किरणकुमार बकाले यांना गुप्त बातमीदारा मार्फत अमळनेर पोलीस स्टेशनच्या गु.र.नं.६९९/२०२० या गुन्हयातील आरोपी शाकिर शहा ऊर्फ पप्पु बंम इब्राहिम शहा (रा. आझादनगर भोईवाडा, धुळे) असल्याची माहिती मिळाल्याने त्यानी या पथकाला सूचना दिल्यावर या पथकाने धुळे येथे जावुन आरोपीचा शोध घेवून त्यांस ताब्यात घेतले . त्यांचे साथीदार सद्दाम ऊर्फ बोबडया रशिद शेख ( वय २० रा. बाबानगर, धुळे ) , नईम शाह सलीम शहा ( वय २५ रा. भोईवाडा वडजीरोड, धुळे ) सलमान ऊर्फ मन्या अन्सारी ( रा. कबीरगंज धुळे ) असे निष्पन्न केले. त्यापैकी शाकिर शहा , सद्दाम शेख , नईम शाह यांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी गुन्हा कबुल केल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करुन अमळनेर पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले .