यावल ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील किनगाव येथील गॅरेज समोरून एकाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश राजेंद्र पाटील रा. किनगाव ता.यावल याने त्याचे मामा भागवत मुरलीधर पाटील यांची दुचाकी (एमएच १८ युके ०७४९) क्रमांकाची दुचाकी किनगाव येथील दीपक ऑटो गॅरेज समोर ११ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पार्किंग करुन लावली होती. दरम्यान पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. गणेश पाटील याने दुचाकीचा सर्वत्र शोधाशोध केली परंतू दुचाकी कुठेही आढळून आले नाही. अखेर सोमवारी १३ जून रोजी दुपारी २ वाजता यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र बाबुले करीत आहे.