जळगाव ( प्रतिनिधी ) – अजिंठा चौफुलीवरील बाफना यांच्या गोडावून समोरून मोटारसायकलची चोरी झाली एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
जयंत प्रकाश बोरोले (वय-३१) हे कानळदा येथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ४ जुलै रोजी दुपारी (एमएच १९ बीए ५१२१) क्रमांकाच्या मोटारसायकलने आले. त्यांनी अजिंठा चौफुलीवरील आर.सी.बाफना गोडावूनच्या समोर लावली होती. अज्ञात चोरट्यांनी ही १५ हजार रूपये किंमतीची मोटारसायकल चोरून नेली त्यांनी सर्वत्र शोध घेतला परंतू मोटारसायकल कुठेही मिळाली नाही. अखेर १३ जुलै रोजी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना गणेश शिरसाळे करीत आहेत