चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील सोनगाव शिवारातील शेतातून गोऱ्हा , गाय व चार बैल यांची चोरी झाली चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ममराज भाईदास जाधव ( रा. सोनगाव ) शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांचे सोनगाव शिवारातील शेतात पत्र्याचे शेड आहे. त्यांनी एक गाय आणि चार बैल बांधलेले होते. १२ जुलै रोजी सायंकाळी गुरांना चारा टाकून ते घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी १ लाख ६० हजार रुपये किंमतीची १ गाय ४ बैल आणि एक किल्लारी जातीचा गोऱ्हा या गुरांची चोरी करून नेला आहे. 13 जुलै रोजी सकाळी शेतात आल्यावर त्यांना गाय , ४ बैल आणि गोऱ्हा दिसून आले नाही. त्यांनी शोधाशोध केली. कुठेही शोध लागला नाही. त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो हे कॉ नितीन सोनवणे करीत आहेत