मुंबई ( प्रतिनिधी ) – राज्यात आता पेट्रोल ५ व डिझेल ३ रुपयांनी स्वस्त होणार आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय जाहीर केला .
पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर कर कमी होणार आहे .
राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविण्यात येणार आहे . केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० राज्यात राबविणार आहेत नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार आहेत ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. असून त्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून .महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा.करण्यात येणार आहे आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा गौरव करण्याची योजना पुन्हा सुरु केलीय जाणार आहे.