जळगाव (प्रतिनिधी ) – कलरबोव मल्टीपर्पज फाऊंडेशन च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त बालसुधारगृहातील मुलांसाठी वरण बट्टी या खानदेशी जेवण देऊन कार्यक्रम पार पडला. यंदा फाऊंडेशनला 5 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रत्येक महिन्यात एक आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे यावेळी संस्थेचे सचिव आकाश बाविस्कर यांनी सांगितले.
कार्यक्रमात प्रज्वल बोरसे यांनी येथील बालकांना आपल्या पुढल्या आयुष्याच्या वाटा आपण कश्यारीतीने स्वतः निर्माण करू शकतो या विषयावर व्याख्यान दिले. यादरम्यान उपस्थित मुलांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी कुठल्या गोष्टी योग्य त्यांना कश्यारीतीने मिळवावे यासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ. संगीता वाघ यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करून करण्यात आले. यावेळी बालसुधारगृहाचे अधीक्षक रविकिरण अहिरराव, सौ. जयश्री पाटील, उपअधीक्षक दिगंबर पाटील तसेच संस्थेच्या अध्यक्षा सौ. संगीता वाघ, उपाध्यक्षा सौ. संगीता सावळे, खजिनदार निलेश भोई, तसेच जय मोरया इव्हेंट्स चे मालक गौरव विसपुते, मिस इंडिया हेरिटेज गायत्री ठाकूर, मनोज वाघ आदी उपस्थित होते. तर मयुरा ठाकूर, प्रज्ज्वल बोरसे, हिमानी पांडे, उज्वल पवार, यश चौधरी, प्रियांका चौधरी, निकिता बारी, साक्षी सागरे, कुणाल विसपुते, सारंग सोनावणे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आकाश बाविस्कर यांनी मानले.