जळगाव (प्रतिनिधी) – गजानन माध्यमिक विद्यालय राजवड तालुका पारोळा येथील आदर्श शिक्षिका बबिता उस्मान पटेल यांना दिनांक 13 डिसेंबर रोजी आदिल शाह फारूकी बहुउद्देशीय संस्था अडावद तालुका – चोपडा या संस्थेमार्फत पत्रकार भवन जळगाव येथे खानदेश भूषण पुरस्कार उपशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या हस्ते बहाल करण्यात आला. त्याप्रसंगी डॉ . अबुल करीम सालार, फारुख भाई मन्यार, हकीम चौधरी, नुरुद्दिन मुल्लाजी, डॉ .धमेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले. बबिता पटेल या उपक्रमशील शिक्षिका असून शैक्षणिक क्षेत्रात त्यांची कार्य उल्लेखनीय आहे . आपला जिल्हा आपला उपक्रम जळगाव यात बबीता पटेल यांच्या या उपक्रमांचा समावेश आहे. या पुरस्कारामुळे बबीता पटेल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.








