जळगाव ( प्रतिनिधी ) – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गोदावरी फाऊंडेशन संचलित विविध शैक्षणिक संकुलामध्ये अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मार्ल्यापण केले.
गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी, होमिओपॅथी, कृषी, विधी, गोदावरी व्यवस्थापन, गोदावरी सीबीएसई,डॉ. उल्हास पाटील सीबीएसई भुसावळ व सावदा, गोदावरी स्कूल, जळगाव येथे महामानवास अभिवादन करण्यात आले. मान्यवरांसह विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा दिला.