• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जैन इरिगेशनचे एकल व एकत्रित आर्थिक निकाल जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 13, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

30 सप्टेंबर 2022 अखेर तिमाही

व अर्धवार्षिक काळातील निकाल

जळगाव (प्रतिनिधी) – भारतातील कृषि व सूक्ष्मसिंचन क्षेत्रातील अग्रणी व जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्सने आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाही व अर्धवर्षाचे एकल व एकत्रित निकाल जळगाव येथे 11 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक तथा उपाध्यक्ष अनिल जैन यांनी कंपनीच्या आर्थिक स्थिती व निकालांबाबत सुसंवाद साधला.

आर्थिक वर्ष 2022-23 च्या अर्धवर्षातील एकत्रित उत्पन्न 3650.4 कोटी रुपये आहे तर गत आर्थिक वर्षात 3422.1 कोटी रुपये होते जे ह्या वर्षी 228.3 कोटी रुपयांनी जास्त आहे. कर, व्याज आणि घसारापूर्व नफा पाहिला तर 435.5 कोटी रुपये आहे, गत आर्थिक वर्षात तो 496.6 होता म्हणजे 61.1 कोटी रुपयांनी या आर्थिक वर्षात तो कमी नोंदविला गेला. आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीचे एकल उत्पन्न 1607.6 कोटी रुपये आहे तर गत आर्थिक वर्षात 1644.6 कोटी रुपये होते जे ह्या वर्षी 37 कोटी रुपयांनी कमी आहे. कर, व्याज आणि घसारापूर्व नफा पाहिला तर 166.1 कोटी रुपये आहे, गत आर्थिक वर्षात तो 232.8 होता म्हणजे 66.7 कोटी रुपयांनी या आर्थिक वर्षात तो कमी नोंदविला गेलेला दिसतो आहे

आर्थिक वर्षातील दुसरी तिमाही व अर्धवर्षातील एकल निकालाचे वैशिष्ट्ये –

* या वर्षी कर्ज निराकरण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर वित्त खर्चात बचत झाल्यामुळे, उत्पादनासाठी लागणाऱ्या खर्चामुळे मार्जिनवर परिणाम झाला तरी रोख नफा सुधारला.

* जैन उच्च कृषि तंत्रज्ञान, टिश्युकल्चर मागणी अधिक आल्याने टिश्यू कल्चर व्यवसायामुळे वाढ दिसत आहे.

* 30 सप्टेंबर 2022 पर्यंत स्वतंत्र निव्वळ कर्ज – ₹ 2728 कोटी, 30 जून पासून किंचित वाढले. (रोख रकमेच्या जास्त वापरामुळे आणि दैनंदिन व्यवहारासाठी उपयोग वाढल्याने)

* ऑर्डर बुक: 1785.4 कोटी रुपये च्या एकूण ऑर्डर्स कंपनीकडे बुक आहेत ज्यामध्ये हाय-टेक अॅग्री कच्चामाल विभागाच्या 1228.6 कोटी ऑर्डरचा समावेश आहे, तर 556.6 कोटी रुपये प्लास्टिक विभागासाठी मिळालेल्या ऑर्डर्सचा समावेश आहे.

आर्थिक वर्षातील दुसरी तिमाही व अर्धवर्षातील एकत्रित निकालाचे वैशिष्ट्ये –

* जागतिक आव्हानात्मक परिस्थितीमुळे एकत्रित महसूल लवचिक राहिला आहे.

* 30 सप्टेंबर 2022 पर्यंत एकत्रित सकल कर्ज ₹ 6568 कोटी आहे. 30 जून 2022 पासून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची तीव्र घसरण झाल्यामुळे वाढले आहे.

* ऑर्डर बुक: 3017.7 कोटी रुपये च्या एकूण ऑर्डर्स कंपनीकडे बुक आहेत ज्यामध्ये हाय-टेक अॅग्री कच्चामाल विभागाच्या 1619.2 कोटी ऑर्डरचा समावेश आहे, तर 571.5 कोटी रुपये प्लास्टिक विभागासाठी मिळालेल्या ऑर्डर्स त्याच प्रमाणे कृषि अन्न प्रक्रिया विभागातील 827.0 कोटी रुपयांच्या ऑर्डरचा समावेश आहे.

व्यवस्थापकिय संचालक तथा उपाध्यक्ष अनिल जैन यांचा कोट –

“आम्हाला आर्थिक वर्ष 2022-23 मधील दुसरी तिमाही आणि अर्धवार्षिकाचे लेखा परीक्षणा पूर्वीचे आर्थिक निकाल जाहीर करताना आनंद होत आहे. आव्हानात्मक जागतिक परिस्थिती असली तरी कंपनीची दुसरी तिमाहीचे एकत्रित उत्पन्न 1610 कोटी रूपये (कर, व्याज आणि घसारापूर्व नफा मार्जिन 10.3 टक्के) लवचिक योजनेनुसार राहिले. पहिल्या सहामाहीत एकत्रित उत्पन्न 6.7 टक्क्यांनी वाढले आहे आणि ते 3650 कोटी रुपयांवर पोहोचले. कर व्याज घसारा पूर्व मार्जिन 10.3 टक्के राहिला.

पाॅलीमरच्या किंमतीमधील अस्थिरतेमुळे मार्जिनवर विपरीत परिणाम झाला. हा परिणाम हंगामी आणि क्षणिक आहे कारण आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या सहामाहीत उत्पन्नाचे प्रमाण शंभरात 60 असे असते व पहिल्या सहामाहीत ते आर्थिक वर्ष 2022-23 दुसऱ्या सहामाहीत 40 असते. वाढत्या ऑर्डर्समुळे आणि स्थिर खर्च पूर्ण वर्षाच्या बेसिसवर उत्तम तऱ्हेने शोषले गेल्यामुळे मार्जिनमध्ये लवकरच सुधारणा होईल. अलीकडील महिन्यात पॉलीमरच्या किंमतीत सुधारणा झाल्यामुळे आमची उत्पादने ग्राहकांना रास्त दरात मिळतील. तिमाहीत कंपनीने कंत्राटाचा दरातील 2067.5 कोटी रूपयांचा करार ‘जल जीवन मिशन’ खाली मिळविला आहे. मार्जिनमध्ये आणि रोख प्रवाह (Cash Flow – कॅश फ्लो) यामध्ये सुधारणा कंपनी सतत करेल व दीर्घकालीन उद्दिष्टे प्रयत्नपूर्वक साध्य केले जातील.”

अनिल जैन

व्यवस्थापकीय संचालक,

जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमीटेड, जळगाव


 

Tags: #JALGAON #JAIN GROUP @JAIN SAMUH
Previous Post

व्यापाऱ्याला धमकावून बळजबरीने कार्यालयातून नेली कागदपत्रे, वस्तू

Next Post

‘इंडिया अॅग्रीबिझनेस अवॉर्ड्स 2022’पुरस्काराने

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

‘इंडिया अॅग्रीबिझनेस अवॉर्ड्स 2022’पुरस्काराने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon