दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना बक्सर जिल्ह्यातील चौसामधील महादेव घाटाच्या परिसरात उत्तर परदेशातून सुमारे १०० हुन अधिक मृतदेह वाहून आल्याची घटना घडली आहे. यावरून राष्ट्रवादीचे राज्याचे जलसंपदामंत्री यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ‘ उत्तर परदेशातून बक्सर जिल्ह्यातील चौसामधील महादेव घाटाच्या परिसरात वाहून आल्याची घटना घडल्याचे पाहिले. हि घटना अत्यंत क्लेशदायी आहे. उत्तर प्रदेशात कोरोनाचे प्रमाण वाढलेले असावे. या मोठ्या लोकसंख्या असलेल्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सरकारला अपयश आलेले आहे. देशाच्या व्यवस्था कशा अपयशी ठरायला लागलेल्या आहेत. हे तेथील लोकांच्या लक्षात आले असल्याचे पाटील म्हणाले.
राष्ट्रवादीचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज माध्यमी प्रतिनिधींशी संवाद सोडला. यावेळी मंत्री पाटील यांनी बक्सर जिल्ह्यातील चौसामधील महादेव घाटाच्या परिसरात उत्तर परदेशातून वाहून आलेल्या मृतदेह्याबाबत मत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले, :’ कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत असल्याचे पाहत असताना दुसरीकडे लोकांचे मृतदेह नदीत पाहायला मिल्ने हे धक्क्कादायक आहे. कोरोनामुळे जास्त प्रमाणात लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्या ठिकाणी राहत असलेले लोक कोरोनाने मृत्यू झालेल्या लोकांचे मृतदेह नदीत सोडत आहेत असून तेच पाणी इतर लोक पीत आहेत. हे खूप धक्कादायक आहे.
अशा परिस्थितीतून वाचायचे असेल तर केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यातील लोकसंख्येच लसीकरण करणे गरजेचे आहे. हाच एकमेव उपाय आहेत. मोठ्या प्रमाणात देशात लसीकरण केल्यास नक्कीच लोकांचे प्राण वाचू शकतील. त्यासाठी देशात लस निर्माण करणाऱ्या कारखान्यांकडून फ्रेंचायझी घेऊन नवे कारखाने उभे करावे लागतील. मोठ्या प्रमाणात लस निर्माण करुन लोकांचे लसीकरण करणे. पुढच्या काही दिवसांमध्ये तसेच महिन्यांमध्ये लोकांचे लसीकरण करणे हाच एक मार्ग आहे. अशी मत यावेळी जलसंपदामंत्री पाटील यांनी व्यक्त केले.