जामनेर ( प्रतिनिधी ) – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बजावलेल्या 160 च्या नोटीसचा जामनेरमध्ये भाजपकडून निषेध करीत होळी करण्यात आली .
जामनेरमध्ये आज नगरपालिका चौकामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे सरकारने बजावलेल्या नोटीसचे दहन करून महाविकास आघाडी सरकारचा जामनेर तालुका भाजपाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला . तीव्र घोषणाबाजी करण्यात आली
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर , तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जितेंद्र पाटील , नवल राजपूत, नगरसेवक महेंद्र बाविस्कर , उपनगराध्यक्ष शरद पाटील , दीपक तायडे , अतिश झाल्टे, बाबुराव हिवराळे , धोंडू पाटील , तुकाराम निकम , अनिस शेख, खलील भांजा, दीपक महाराज , रवींद्र झाल्टे, कैलास पालवे, निलेश चव्हाण यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.