चार तासापासून मृत्यू देहाचा शोध सुरू
जळगाव ( प्रतिनिधी ) – मित्रांसोबत फोटो काढण्यासाठी कांताई बंधाऱ्याच्या परिसरात गेलेल्या जळगाव शहरातील एका तरुणाचा आज दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास या बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली .
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार , जळगावातील वानखेडे सोसायटी ( साईबाबा मंदिराजवळ ) भागातील रहिवाशी शुभम कांतीलाल चव्हाण अशी या २० वर्षीय तरुणाची ओळख पटली आहे . तो त्याच्या अन्य चार – पाच मित्रांसोबत फोटो काढण्यासाठी कांताई बंधारा परिसरात गेला होता . मित्रांची मस्करी चालू असताना त्यापैकी २ जण पाय घसरून पाण्यात बुडाले होते यापैकी एकाला या मित्रांनी वाचवले मात्र शुभमचा बुडून मृत्यू झाला . या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली . पोलिसांनी पोहणारांना घटनास्थळी पाचारण केले होते मात्र सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत शुभमच्या मृतदेहाचा शोध लागला नव्हता .
शुभमचव्हाणच्या वडिलांचे न्यू बी जे मार्केटमध्ये चव्हाण इलेक्ट्रिकल्स नावाचे दुकान आहे . त्याच्या पश्चात २ बहिणी , आई – वडील आणि आजोबा असा परिवार आहे . शुभम एकुलता एक होता . वानखेडे सोसायटी भागात हळहळ व्यक्त होत आहे.