जळगाव ( प्रतिनिधी ) – कर्जबाजारीला कंटाळून अहुजा नगरातील ३९ वर्षीय तरूणाने राहत्या घरात सुसाईड नोट लिहून दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अविनाश उर्फ बाळू अरुण बोरसे (वय-३९, रा. सुकृती अपार्टमेंट, अहुजा नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अविनाश उर्फ बाळू अरूण बोरसे हा पत्नी व मुलांसह अहुजा नगरातील संकृती अपार्टमेंट मध्ये वास्तव्याला आहे. काही दिवसांपासून अविनाश बोरसे यांची पत्नी बाहेरगावी गेल्या होत्या. त्यामुळे अविनाश घरी एकटाच होता. १२ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अविनाशची आई सुनंदाबाई यांनी फोन लावण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतू फोन लागत नव्हता म्हणून त्यांनी भाचा प्रशांत रमेश पाटील यांना फोन करून सांगितले की, अविनाशची तब्बेत बरी नाही, त्याचा फोन लागत नाही, त्याची पत्नी व मुलगी देखील घरी नाही, त्यामुळे तू घरी जावून बघ आणि मला सांग असे सांगितले. त्यानुसार प्रशांत पाटील हा घरी गेला असता अविनाशचा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्याने बाल्कनीमधून डोकावून पाहिले असता अविनाशने गळफास घेवून आत्महत्याचे केल्याचे दिसून आले. अविनाशने आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात “मी कर्जबाजारी झालेला असल्याने स्वत:च्या जीवनाला कंटाळून आत्महत्या करत आहे” असे नमूद केल्याचे आढळून आले. याबाबत तालुका पोलीसांना कळविण्यात आले. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.