जळगाव (प्रतिनिधी) – भुसावळ विभागातील विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सोमवारी शेंगांव, नांदुरा, मलकापूर रेल्वे स्थानकांची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्यात. रेल्वेमध्ये प्रवाशांना सुविधा देण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. एस. केडिया, गति शक्ती युनिटचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक नवीन पाटील व इतर अधिकाऱ्यांनी अमृत भारत योजनेअंतर्गत शेगांव, नांदूरा व मलकापुर या स्थानकांची पाहणी केली. शेगांव स्टेशनवर होमलैंड प्लेटफार्म, ३ री व ४ थी लाइनचे प्लानिंग, प्रवाशाला दुचाकी व चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था, पाथवे, स्थानकावरील शेड, प्रतीक्षालय, आराम कक्ष, पादचारी पूल, लिफ्ट, सरकता जीना, गार्डन याची पाहणी व कश्या प्रकारे नियोजन असेल याबाबत माहिती देण्यात आली.
नांदुरा स्टेशन पार्किंग, ड्रॉप एण्ड गो एरिया, लिफ्ट, पादचारी जीना, शेड व इतर प्रवासी सुविधा तसेच मलकापुर स्टेशन वर ३ आणि ४ थी लाइन, बुकिंग ऑफिस, पार्किंग, जाण्यायेण्यासाठी प्रवेशद्वार, माल गोदामसाठी स्वतंत्र रस्ताचे नियोजन यावेळी करण्यात आले. इतर प्रवासी सुविधावर विचार विमर्श केले गेले. निरीक्षणदरम्यान वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ.शिवराज मानसपुरे, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता पालटासिंग, वरिष्ठ विभागीय सिग्नल व दूरसंचार अभियंता विजय कांची, डेप्युटी मुख्य अभियंता निर्माण पंकज धावरे, विभागीय सुरक्षा आयुक्त श्रीनिवास राव व मंडल अभियंता शुक्ला, सहायक सुरक्षा आधिकारी सोनवणे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.