पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली.
आज नगरपालिकेच्या सभागृहात पाचोरा विभागाचे प्रांताधिकारी विक्रम महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रभाग क्रमांक १ व प्रभाग क्रमांक ९ या प्रभागासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.
यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्योती भगत यांनी सांगितले की, सन २०११ च्या जनगणनेनुसार शहरातील मतदारांची संख्या ३७६६६ असुन शहरात २४ प्रभाग आहेत. यात १२ पुरुष तर १२ महिला असे नगरसेवक असतील. नगरपालिकेच्या सभागृहात गौतमी मोरे हिच्या हातुन सोडतीची चिठ्ठी काढण्यात आली.
प्रभाग क्रमांक ९ अ मध्ये अनुसूचित जमाती महिला राखीव तर ब सर्वसाधारण राहाणार आहे. प्रभाग क्रमांक १) अ, एस, सी महिला, ब, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २) अ, सर्व साधारण महिला, ब, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ३) अ सर्व साधारण महिला ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ४) अ, सर्व साधारण महिला ब सर्वसाधारण ,प्रभाग क्रमांक ५) अ सर्व साधारण महिला ब सर्वसाधारण , प्रभाग क्रमांक ६) अ सर्व साधारण महिला ब सर्वसाधारण , प्रभाग क्रमांक ७) अ सर्व साधारण महिला ब सर्वसाधारण , प्रभाग क्रमांक ८) अ सर्व साधारण महिला ब सर्वसाधारण , प्रभाग क्रमांक ९) अ सर्व साधारण महिला ब एस, टी, सर्वसाधारण , प्रभाग क्रमांक १०) अ सर्व साधारण महिला ब सर्वसाधारण , प्रभाग क्रमांक ११) अ सर्व साधारण महिला ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १२)अ सर्व साधारण महिला ब सर्वसाधारण असे आरक्षण आज काढण्यात आले.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष दिपक अनुष्ठान, कैलास पाटील, कार्यालयीन अधिक्षक संघमित्रा सदानशिव, लिपिक सुभाष थोरात, हिम्मत पाटील व नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.