जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील नेरी नाका येथील एसटी वर्क शॉप परिसरात मोकळ्या जागेत पडलेल्या भंगारातील वस्तूंना अचानक आग लागली. या घटनेत किरकोळ नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
१२ जून रोजी दुपारी ४ वाजता एस.टी. वर्कशॉपच्या मागे असलेल्या भंगारला भर पावसात आग लागल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळाली. त्यानुसार तत्काळ २ बंब घटनास्थळी दाखल झाले बंबाने पाण्याचा तसेच फोमचा वापर करत आगीवर नियंत्रण मिळविले अग्निशमन दलाचे जवान भारत बारी, रविंद्र बोरसे, वाहन चालक-युसुफ पटेल, नंदकिशोर खडके, मोहन भाकरे, नितीन बारी यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी परिश्रम घेतले.