अमळनेर ( प्रतिनिधी ) – येथील नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आरक्षण जाहीर करण्यात आले 18 प्रभागांच्या 36 सदस्यांपैकी 3 अनुसूचित जाती, 2 अनुसूचित जमाती, तर 15 जागांवर सर्वसाधारण महिलांना स्थान देण्यात आले आहे. इतर सर्व ठिकाणी सर्वसाधारण आरक्षण आहे.
प्रभाग क्रमांक 2, 4 व 6 हे प्रभाग राखीव असून त्यात प्रभाग क्रमांक 2 व 6 हे अनुसूचित जातीमधील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
प्रभाग क्रमांक 3 व 18 राखीव असून त्यातील प्रभाग क्रमांक 3 अनुसूचित जमाती मधील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
महिला सर्वसाधारण आरक्षण हे प्रभाग क्रमांक 1, 5, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 व 18 हे प्रभाग सर्वसाधारण महिला संवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले असून उर्वरित सर्व जागा ह्या सर्वसाधारण जाहीर करण्यात आल्या आहेत.
या आरक्षणावर कोणाला आक्षेप असल्यास 15 ते 21 जून पर्यंत हरकत घेता येणार आहे. या आरक्षण सोडतीचे पिठासन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी काम पाहिले तर मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी आरक्षण सोडतीची कार्यवाही केली.