पारोळा ( प्रतिनिधी ) – येथील ब्रम्हलीन महामंण्डलेश्वर रामचैतन्य बापु तपोभूमी आश्रमात संत दगाजी बापु तथा महामंण्डलेश्वर रामानंद पुरी महाराज भक्त परिवारातर्फे तसेच रामचैतन्य सेवा आश्रमचे सेवाकरी संत दगडू महाराज यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन केले होते.
१२ जुलैरोजी रात्री रामधुन सुरू झाली.सामुहिक माला आणि भजन संध्येचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी भक्त परिवारातर्फे विविध शुभाकाशी बहुउद्देशीय संस्था संचलित न्यु माऊली नेत्रालय (पाचोरा ) यांच्या सौजन्याने डोळे तपासणी शिबीर घेण्यात आले डॉ.संतोष पवार. डॉ गोपाल नाईक, .संदिप राठोड उपस्थित होते . संत शिवा महाराज यांचे प्रवचन झाले गटविकास अधिकारी सुभाष जाधव , कांतिलाल नायक ( बंजारा सेना राष्ट्रीय अध्यक्ष ) , शालिकराम ( उत्सव समिती अध्यक्ष ) , दगडू महाराज, भावडू नायक, शाम जाधव यांचे भाषण झाले १३ जुलै रोजी सकाळी प्रभात फेरी व आरती, गुरू पादुका पुजन करण्यात आले, दुपारपासुन सायंकाळपर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात आलेे.
याप्रसंगी आत्माराम जाधव, शाम जाधव, विलास जाधव, विठ्ठल जाधव, अशोक भाऊ, मनोहर जाधव, भावडू नायक, बच्छराज जाधव, मनोहर जाधव, विजय जाधव, अरविंद जाधव यांच्यासह असंख्य भक्त उपस्थित होते.