जळगाव (प्रतिनिधी) – संत तोताराम महाराज नवचैतन्य लेवा पाटील समाज मंडळाच्या वधू-वर परिचय पुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले.
संत तोताराम महाराज नवचैतन्य लेवा पाटील समाज मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे, मनसेचे तालुकाध्यक्ष मुकुंदा रोटे, जळगाव समाज मंडळ अध्यक्ष हेमंत भंगाळे, नितीन धांडे, मीनाक्षी धांडे, निता वराडे, दिनेश भंगाळे, दीपक धांडे, कडु पाटील, वसंत कोलते, शिशिर भंगाळे, किशोर कोलते, कमलाकर वारके, तुषार वारके आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत भंगाळे यांनी केले. तर आमदार राजूमामा भोळे व रोहिणी खडसे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन भोळे, अशोक भारंबे, धर्मराज देवकर, बाबू भंगाळे, प्रशांत महाजन, हेमराज वराडे, सीमा फेगडे, पूनम सावदेकर, देवयानी कोलते, स्वप्नील खडसे, चेतन कोलते, रवींद्र पाटील, ललित पाटील, विशाल सुतार, पवन कोलते, मयूर लोखंडे, नीलेश वारके, सुपडू महाजन, गणेश भंगाळे, गणेश धांडे, गणेश पाटील, विष्णू खडसे, नरेंद्र लोखंडे, सोपान कोलते यांनी सहकार्य केले.







