जळगाव (प्रतिनिधी) – राज्य सरकारने नुकताच महिलांवरील अत्याचासाठी जाहीर केलेल्या शक्ती कायद्याचे आज शहरातील टॉवर चौकात महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकार्यांनी पेढे वाटून स्वागत केले.

शहरात राज्य सरकाने जाहीर केलेल्या शक्ती कायद्याचे घोषणाबाजी करून जोरदार स्वागत करण्यात आले. महिला शक्तीचा विजय असो, ” फुल नही चिंगारी है ये भारत की नारी है” यासारख्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. शक्ती कायद्याचे फटक्यांची आतिषबाजी व नागरिकांना पेढ्यांचे वाटप करून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी राष्टवादी कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, कल्पिता पाटील, ममता तडवी, शिवसेनेच्या सरिता माळी, मंगला बारी, शोभा चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







