• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शासनाकडे वृत्तपत्रांसाठी आर्थिक पॅकेजची मागणी – एल. आदिमूलम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 13, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – कोविड-19 मुळे जाहिराती आणि वितरणाला मोठा फटका बसल्याने वृत्तपत्र उद्योग महसुलातील घटीच्या अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहे. अनेक प्रकाशने बंद झाली आहेत किंवा काही आवृत्त्या अनिश्‍चित काळासाठी स्थगित झाल्या आहेत. हीच स्थिती राहिली तर नजीकच्या भविष्यात आणखी अनेक प्रकाशने बंद होतील. तसेच अनेक वृत्तपत्रांमध्ये निम्म्याच कर्मचाऱ्यांच्या बळावर कामकाज सुरु आहे. त्यामुळे इतर उद्योगांना ज्याप्रमाणे सरकार पॅकेजेस देत आहे, तसेच एक मदतीचे पॅकेज वृत्तपत्रांसाठी देण्याची मागणी जोर धरत आहे.

इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे (आयएनएस) अध्यक्ष एल. आदिमूलम यांनी केंद्र सरकारकडे वृत्तपत्र उद्योगाला प्रोत्साहन पॅकेज देण्याची मागणी एका ई-मेलद्वारे केली आहे. आयएनएसनुसार, गेल्या आठ महिन्यांत उद्योगाचे सुमारे 12,500 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे आणि वर्षअखेरपर्यंत ते 18,000 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते.

सर्वात मोठ्या लोकशाहीचा चौथा स्तंभ कोसळल्यास गंभीर सामाजिक-राजकीय परिणामांची कल्पना सहजपणे केली जाऊ शकते. त्यामुळे किमान 30 लाख कामगार व कर्मचाऱ्यांवरही परिणाम होईल. ते वृत्तपत्र उद्योगात पत्रकार, प्रिंटर, डिलिव्हरी व्हेंडर आणि इतर अनेक रूपात काम करत आहेत. वृत्तपत्र उद्योग कोसळण्याचा विनाशकारी परिणाम लाखो भारतीयांवरही होईल, त्यात कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय समाविष्ट आहेतच. शिवाय त्याच्याशी जोडलेले उद्योग, प्रिंटिंग प्रेस, न्यूजपेपर व्हेंडर आणि डिलिव्हरी बॉयसहित वितरणाच्या पुरवठा साखळीसह इको-सिस्टिमवर परिणाम होईल. अनेक दशकांपासून उदरनिर्वाहासाठी ते या उद्योगावर अवलंबून आहेत.

भारतीय वृत्तपत्र उद्योगाने आव्हानात्मक काळात सत्यापित व तथ्यात्मक बातम्यांच्या प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. तिची वेळोवेळी सुप्रीम कोर्ट, कार्यपालिकेनेही प्रशंसा केली आहे. हा उद्योग संकटातून बाहेर पडण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे आणि त्याचे लक्ष आता सरकारकडे आहे. उद्योगाला अत्यावश्‍यक प्रोत्साहन पॅकेज द्यावे, अशी सरकारकडे मागणी आहे.

या आहेत मागण्या…
1. न्यूजप्रिंट, जीएनपी आणि एलडब्ल्यूसी पेपरवर उर्वरित 5% कस्टम ड्यूटी रद्द करावी
2. किमान दोन वर्षांचा टॅक्‍स हॉलिडे दिला जावा
3. शासकीय जाहिरातींच्या दरांत 50% वाढ करावी
4. शासकीय जाहिरातींची थकीत देयके त्वरीत अदा करावीत
5. प्रिंट मीडियावर सरकारद्वारे केल्या जाणाऱ्या खर्चात 200% वाढ करावी


 

 

Previous Post

ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरुन विरोध करु – फडणवीस

Next Post

बाजार समित्या म्हणजे शेतकर्‍यांचे कत्तलखाने – सदाभाऊ खोत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बाजार समित्या म्हणजे शेतकर्‍यांचे कत्तलखाने - सदाभाऊ खोत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  
1xbet russia

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू
1xbet russia

विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

March 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

७० वर्षीय वृद्धेचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या जळगावच्या महिलांना अटक

March 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon