अमळनेर ( प्रतिनिधी ) – तीन सावकारांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून शहरातील एका मुद्रांक विक्रेत्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
अमळनेर येथील प्रकाश हरचंद बडगुजर हे मुद्रांक विक्रेते म्हणून व्यवसाय करतात. ११ रोजी त्यांनी सुसाईड नोट पोलिसांसह त्यांच्या काही मित्रांना सोशल मीडियावरून शेअर केली. नंतर त्यांनी लागलीच शौचालयात जाऊन हाताची नस कापून घेतली. ही सुसाईड नोट पाहताच पो हे कॉ सुनील हटकर यांनी पो नि जयपाल हिरे यांना माहिती कळवली. पो हे कॉ रामकृष्ण कुमावत, नीलेश मोरे यांनी बडगुजर यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे मुद्रांक विक्रेत्याचे प्राण वाचले असले तरी संबंधीत दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत आहे. बडगुजर यांनी सुसाईड नोटमध्ये तीन सावकारांची नावे लिहली असल्याने सावकारीचा मुद्दा देखील चर्चेत आला आहे.