जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील गोलाणी मार्केट परिसरातून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुकलाल तुकाराम बारी (वय-४७) रा. वाणी गल्ली, शिरसोली जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. जळगावातील गोलाणी मार्केट येथे फुल विक्री करण्याचे काम करतात. शनिवारी ९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता ते दुचाकी (वय-१९ बीबी ९२६६) ने गोलाणी मार्केट येथे आले. दुचाकी पार्क करून कामाला निघून गेले. दरम्यान, सायंकाळी ६ वाजता घरी जाण्यासाठी दुचाकी जवळ आले असता त्यांना दुचाकी आढळून आली नाही. तीन दिवस दुचाकीचा शोध घेतला परंतू दुचाकी आढळून आली नाही. अखेर मंगळवारी १२ एप्रिल रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश पाटील हे करीत आहे.