पाचोरा ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव येथे 10 एप्रिलरोजी राज्यस्तरीय अबॅकस , वेदिक मॅथ्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेसाठी राज्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते. पाचोऱ्याच्या वेदीकस इंटरनॅशनल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक बक्षिसे मिळवून यश संपादन केले.
अबॅकसच्या 4 लेव्हल आणि वेदिक मॅथ्सच्या 2 लेव्हल मध्ये पाचोऱ्याच्या वेदीकस इंटरनॅशनल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पहिल्या तीन क्रमांकाचे बक्षीस मिळवून राज्यभर लौकिक मिळवले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आशिष पाटील, दिनेश न्हावकर, सुदर्शन पाटील, छाया पाटील, कांचन वाघ, मोनाली वरखेडे, मिनाक्षी ,श्रीमती. उपासने , बावस्कर यांची लाभली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली.
गुणवंत विद्यार्थ्यांचे व अकॅडमीचे संचालक रविंद्र पाटील आणि श्रीमती सपना शिंदे यांचे पालकांनी कौतुक केले.