सावदा ( प्रतिनिधी ) – सवदा शहरातील एका वृध्द व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत सावदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, उखर्डू चौधरी ( वय – ७५ ) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. १२ एप्रिल रोजीच्या मध्यरात्री त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सावदा पोलीसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात मुलगा, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे.