जळगाव (प्रतिनिधी) – बकऱ्यांना चारा टाकण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील कुऱ्हाडदा येथील १७ वर्षीय मुलगी ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गावातील वाड्यात बकऱ्यांना चारा टाकण्यासाठी गेली असता गावातील संशयित आरोपी रूपेश ज्ञानेश्वर सपकाळे (कोळी) हा नदीकडून पायी जात असतांना त्याचे लक्ष मुलीकडे गेले. त्यावेळी त्यांनी मुलीचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून ‘झोपड्यात चल’ असे म्हटल्यावर तीन हात झटकून पळत घरी आली. आपल्यावर घडलेली घटना पिडीत मुली आपल्या आईवडीलांना सांगितला. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी रूपेश कोळी यांच्या विरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.