वडती ता.चोपडा (प्रतिनिधी) – वटार व सुटकार या गावातील मुख्य रस्त्याचा प्रश्न ब-याच वर्षापासून भेडसावत होता प्रलंबित होता. तो काही मार्गी लागत नव्हता अनेक लोकप्रकिनिधी आलेत काय न् गेलेत काय, परंतू कोणीही दखल घेतली नाही अथवा मनापासून प्रयत्न केला नाही. दोन्ही गावांच्या दैनदिन गरजा ह्या रस्त्याशीच निगडीत असायच्या. त्या पुर्ण करण्यासाठी ग्रामस्थांची पुर्णत: ससेहोलपट व्हायची. आता हा रस्ता अवघ्या काही दिवसातच काम पुर्णतळास नेवून पुर्णविराम होणार आहे.
अडावद येथून जवळच असलेल्या तापी काठावर वसलेल्या वटार व सुटकार या 5 किमी रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पूर्णत्वास येणार आहे . गेल्या 20 वर्षांपासून हा रस्ता तालुक्यातील सर्वच लोकप्रतिनीधींकडून दुर्लक्षित झाला होता. याचा वापर हंगामी रस्ता म्हणून होत होता. कारण पावसाळ्यात तर बंदच राहत असे. ग्रामस्थाना वापरतांना तारेवरची कसरत करावी लागायची. विध्यार्थ्यांचे, नागरीकांच्या दैनदिन गरजा, बाजार व शासकीय कामकाज व तसेच शेतकऱ्यांचे रहदारीस ये-जा करण्यासाठी फार हाल होत असत.
आजू – बाजूच्या खेड्यातील रस्ते या कालावधीत तीन वेळा डांबरीकरण झाले, परंतु या रस्त्याला सापत्नीक भावाची वागणूक मिळत असे. गेल्या पंचवार्षिकला कार्यसम्राट माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सदर रस्ता मंजूर करून आणला व विद्यमान आमदार लताताई सोनवणे यांनी दर्जेदार पद्धतीने काम सुरू केले .या रस्त्याचा फायदा अडावद गाव,वटार-सुटकार सह जळगाव,एरंडोल धरणगाव तालुक्यतील 35 खेड्यांना होणार आहे त्यामुळे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे व आमदार सौ लताताई सोनवणे यांचे आभार व कौतूक यावेळी आजी, माजी सरपंच, शेतकरीवर्ग, विद्यार्थी, व ग्रामस्थांकडून होत आहे, धन्यवाद देत आहे.







