मुंबई (वृत्तसंस्था)- निवृत्त नौदल अधिकाऱ्यास शुक्रवारी सहा जणांनी मारहाण केली. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये शिवसेनेचे शाखाप्रमुख आणि एका कार्यकर्त्याचा समावेश असल्याचे समजते आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
आशिष शेलार म्हणाले कि, कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेत, याकुबच्या फाशीला विरोध करणारे मुंबईचे पालकमंत्री. टायगर मेमनचे घर तोडले नाही, पण कंगणाचे घर तोडलेत. आता देशासाठी लढलेल्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला अमानुष मारहाण! निषेध!! पुढे काय? दाऊदला पालिकेचे टेंडर आणि पाकिस्तान सोबत टक्केवारी?, अशी टीका त्यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
दरम्यान, शुक्रवारी कांदिवली पश्चिम परिसरात निवृत्त नौदल अधिकाऱ्यास मारहाण करण्यात आली. नौदल अधिकाऱ्याने पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे एक कार्टून शेअर केल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांकडून आपल्यावर हल्ला करण्यात आला.







