जळगांव (प्रतिनिधी) – जळगांव एस. टी. आगारात कार्यरत वाहक मनोज चौधरी यांनी पगाराला होणारा विलंब व तटपुंजे वेतन या निराशेमध्ये त्यांच्या राहत्या घरी कुसुंबा येथे आत्महत्या केली. या अनुषंगाने मनसेचे नेते माजी आमदार अँड. जयप्रकाश बाविस्कर यांनी आज त्यांच्या घरी जावुन परीवाराचे सांत्वन केले व आपल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत अशा संवेदना व्यक्त केला.
एस.टी. विभागाने परीवाराला तातडीने आर्थिक मदत करावी म्हणून जयप्रकाश बाविस्कर यांनी एस.टी. चे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्याशी दुरध्वनीवर चर्चा करून तिन महिन्याचा थकीत पगार, अनुकंपा तत्वावर परीवारातील एकाला नोकरी व योग्य ती आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली. यावेळी विभाग नियंत्रक देवरे यांनी मनोज चौधरी यांच्या परीवाराला जिल्हातील सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारातुन १०० रूपये कपात करण्याचा निर्णय झाला असुन अंदाजे पाच लाख रूपये तसेच मनोज चौधरी यांचा तिन महिन्यांचा थकित पगार एक दोन दिवसात त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येतील व परीवारातील एका सदस्यास अनुकंपा तत्वावर तात्काळ नोकरी देण्यात येईल असे आश्वासन दिले.दरम्यान मनोज चौधरी यांच्या आत्महत्येला परीवहन विभागाचे मंत्री अनिल परब हे जबाबदार असुन त्यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मनसेचे नेते अँड. जयप्रकाश बाविस्कर यांनी केली आहे. यावेळी मनसेचे जिल्हा सचिव अँड. जमील देशपांडे, तालुका अध्यक्ष मुकुंदा रोटे, मनसेचे कुसुंबा येथील माजी सरपंच देविदास पाटील, मनोज परदेशी, संदीप मांडोळे उपस्थित होते.








