जळगाव ( प्रतिनिधी ) – सहा वर्षांपासून प्रिंटींग प्रेसमध्ये कामाला असलेल्या कुबेर जितेंद्र राजपूत २२ वर्षीय तरूणाचा आज कामावर असतांना अपघाती मृत्यू ओढवला मालकाने आर्थिक मदत करावी अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे.
‘तरसोद येथील कुबेर राजपूत ६ वर्षापासून जळगाव येथे ‘शिवतेज प्रिंटींग प्रेस’मध्ये कामावर होता. आजदेखील तो कामावर वेळेवर आला होता. सायंकाळी कंपनी मालकांकडून कुबेरचे पाहुणे दीपक यांना फोनवरून ‘कुबेर चक्कर येऊन खाली पडल्याची’ माहिती मिळाली त्याला बेशुद्ध अवस्थेत खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून सिव्हीलमध्ये दाखल केले असता येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कुटुंबीयांनी कुबेरचा मृतदेह बघितल्यावर त्यांना त्याच्या दोन्ही डोळ्यात व्रण आढळून आले . यामुळे त्याच्या नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन करून कंपनीकडून मदत मिळावी अशी मागणी केली आहे.
कुबेरचे वडील जितेंद्र राजपूत यांनी त्यांच्या मुलाला कोणी सिव्हीलमध्ये भरती केले याची माहिती नसल्याचे सांगितले. कुबेर याच्या दोन्ही डोळ्यांमध्ये व्रण दिसत असून हा अपघात नेमका झाला कसा ? याची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी कुबेरच्या कुटुंबीयांनी केली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील आणि ५ बहिणी असा परिवार आहे.