नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच लसीकरणाची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे. पण कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेऊनही अनेक लोक कोरोनाबाधित होत आहेत. त्यावर तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
सीके बिर्ला रुग्णालाचे डॉ. राजा धर यांनी सांगितले, की ‘लस ही एकप्रकारे बूस्टरसारखे काम करते. जे तुम्हाला ताप आणि इतर काही लक्षणांपासून बचाव करण्यास मदत करते. लस घेतल्याने तुम्ही सुरक्षित राहू शकता पण तुम्ही कोणत्याही प्रकारे बेजबाबदार राहू नये’. तसेच मेडिका सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे डॉ. अविरल रॉय यांनी सांगितले, की ‘जेव्हा नाकाच्या माध्यमातून व्हायरस शरीरात प्रवेश करतो, तेव्हा लस तुमच्या शरीराला काही प्रमाणात शक्ती देते. मात्र, आता जी लस दिली जात आहे. ती नाकात नाही तर रक्तात अँटिबॉडीज् तयार करते. मात्र, जर ही लस घेतली तर इन्फेक्शचे प्रमाण कमी होऊ शकते.
तज्ज्ञांनी सांगितले, की ‘एक लस शरीरात काम करण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. कोणत्याही व्यक्तीला 50-60 टक्क्यांपर्यंत सुरक्षित ठेऊ शकते. तर एक्सपर्ट सुरक्षेला 85 टक्क्यांपर्यंत सांगते. तर दुसरा डोस घेतल्यानंतर सुरक्षेचा टक्का 95 पर्यंत पोहोचू शकतो.
लस घेताना मनात कोणताही विचार आणू नये. जेव्हा तुमचा नंबर येईल तेव्हा तुम्ही लस नक्की घ्यावी. लसीमुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचणार नाही. या उलट जर तुम्हाला कोरोना झाला तरी त्यापासून लढण्यासाठी शक्ती मिळू शकते आणि व्हायरसचा प्रभाव कमी होऊ शकतो.