अहमदनगर (वृत्तसंस्था) – भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. देशात दररोज तीन लांखांहून अधिक कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणू संसर्गावर अद्याप औषध तयार झालेलं नाही. कोरोना प्रतिबंधक लसींद्वारे लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. कोरोनावरील उपचारांसाठी एकीकडे रेमडेसिव्हीर आणि इतर औषधांची कमतरता जाणवतं आहे. या परिस्थितीत कोरोना रूग्णांना बरे करण्यासाठी शेवगाव तालुक्यातील बोधेगावचे डॉ. अरुण भिसे यांनी अजब फंडा वापरला आहे. कोरोना रुग्णाला योग्य प्रमाणात दारु दिल्यास तो बरा होता, असा दावा डॉ. अरुण भिसे यांनी केला आहे.
डॉ. अरुण भिसे यांनी त्यांच्याविषयी फिरत असलेल्या पोस्टबद्दल स्पष्टीकरण दिलं. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यानंतर तीव्रतेनुसार टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार औषध घ्यावीत. ज्या दिवशी तुमच्या तोंडाची चव जाईल, जेवण कमी होईल त्या दिवसापासून अल्कोहोल ज्यामध्ये 40 टक्के पेक्षा जास्त आहे, असं कोणतेही म्हणजेच देशी दारु, व्होडका, ब्रँडी किंवा विस्की या पैकी कोणतीही एक दारी 30 मिली आणि 30 मिली पाणी पेशंटला जेवणाअगोदर पिण्यास द्यायचं आहे. पेशंट गरोदर आणि लिव्हर संबंधी आजार नसला पाहिजे. दारु आणि पाणी याचं मिश्रण डॉक्टरांच्या सल्ल्यानं द्यावं, असं आवाहन डॉ. अरुण भिसे यांनी केलं आहे.
पेशंटला दारु का द्यायची याच्या मागचं शास्त्रीय कारणं सांगताना ते म्हणतात. कोरोना विषाणूचं वरचं आवरण लिपीडचं आहे. हे आवरण अल्कोहोलमध्ये विरगळत आणि विषाणू निष्क्रीय होतो. त्यामुळे आपण हाताला सॅनिटायझर वापरतो. दारु शरिरात घेतल्यानंतर ती रक्तवाहिन्यांमध्ये घेतली जाते. तिथून ती 30 सेकंदात दारू सर्व शरिरात पोहोचते. फुप्फुसात दारु पोहोचल्यानंतर दारुचा हवेशी संपर्क झाल्यानंतर, दारु हवेद्वारे बाहेर पडते. या प्रक्रियेदरम्यान ज्याठिकाणी विषाणू असेल तो आवरण गळून पडल्यामुळे निष्क्रीय होतो. दारु ही आयुर्वेदात आसव प्रवर्गात येते. दारु ही भूक न लागण्यावर रामबाण समजली जाते. कोरोना काळात रुग्ण दाखल झाल्यावर मानसिक दबाव असतो. तो दबाव कमी करण्याचं काम दारु करत असते, असं डॉ. अरुण भिसे यांनी सांगितलं आहे.
डॉ. अरुण भिसे यांनी आतापर्यंत 40 ते 50 जणांना दारु घेण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी तो मान्य केल्याची माहिती भिसे यांनी दिली. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आणि दारुचं औषधी प्रमाण घेण्यास सांगतिलं. त्याप्रमाणं 40 ते 50 पेशंट बरे झाले आहेत. त्यापैकी 10 रुग्ण गंभीर होते, ते बरे झाले, आतापर्यंत एकाचाही मृत्यू झाला नाही, असं अरुण भिसे यांनी सांगितलं आहे. डॉ. अरुण भिसे यांच्या दाव्याची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.