जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी इंग्लिश मिडीयम सीबीएसईचा इयत्ता बारावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात ८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्याहून अधिक गुण तर २९ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्याहून अधिक गुण प्राप्त करुन घवघवीत यश संपादन केले.
यात मानव पंजाबी व शिवा सुकुमार यांच्यासह सर्वच विद्यार्थ्यांनी चांगले गुण प्राप्त केले. त्याबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्यासह मुख्याध्यापिका निलीमा चौधरी यांच्यासह शिक्षकवृंदानी अभिनंदन केले.