रावेर ( प्रतिनिधी ) – डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल, सावदाचा शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षाचा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहिर झाला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
यात स्कूलमधील विद्यार्थीनी आश्लेषा अतुल वाणी हिने ९५.४ टक्के प्राप्त करुन प्रथम क्रमांक पटकाविला. दिप्ती प्रमोद शिंदे हिने ९४.६ टक्के मिळवून द्वितीय तर हिमांशू नितीन सरोदे याने ९३.८ टक्के गुण घेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच विराज सुनील चौधरी याने ९२.४ टक्के, निरंजन जितेंद्र महाजन ९२.२ टक्के, भक्ती सचिन मंत्री हिने ९१.२ टक्के, ग्रेसी रवींद्र महाजन ८६.६ टक्के, केतकी श्रीकांत मटकरी ८६.६ टक्के, रितेश प्रभाकर बोंडे याने ८६ टक्के, सत्यम गौरव कुमार याने ८५.४, तेजल रोशन बोंडे हिने ८५.४ टक्के, दिव्येश गणेश निमकणे ८४.८ टक्के, प्रसाद अनिल फेगडे ८४.२ टक्के, आदित्य बारी८४.२ टक्के, आयेशा बाळू साळी ८२.८ टक्के, चिन्मयी नितीन भारंबे हिने ८१ टक्के गुण प्राप्त केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, प्राचार्या भारती महाजन यांच्यासह स्टाफने अभिनंदन केले.