चाळीसगाव, १२ (प्रतिनिधी) – शहरातील हिरापुर रोडवरील बँक ऑफ इंडीयाचे ग्राहक सेवा केंद्राचे तोंडाला मास लावलेले दोन चोरट्यांनी लोखंडी शटर उचकवुन आत प्रवेश करुन दोन लाख ६८ हजार ९२० रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना १० ते ११ मे दरम्यान घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोंडाला मास्क लावलेल्या दोघांनी ग्राहक सेवा केंद्राच्या शटरचे सेंटर लॉक उचकवून आत प्रवेश केला. यानंतर त्यांनी ग्राहक सेवा केंद्रातील बँक ऑफ इंडीयाचे लाकडी ड्रावर स्क्रू ड्रावरने उघडुन त्या दोन्ही ड्रावरमधील एक लाख ८९ हजार ७९ रुपये बँक ऑफ इंडीयाचे बंद लाकडी ड्रावरमधील पाचशे रुपये व शंभरच्या नोटा असे ७९ हजार १३० रुपये, लाकडी काउंटरचे दुस-या ड्रावरमधील पाचशे रुपये व शंभरच्या नोटा अशी एकूण दोन लाख ६८ हजार ९२० रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी ज्ञानेश्वर श्रावण चौधरी (३४) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.