जळगाव (प्रतिनिधी) – वावडदा येथील एल. एच पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल १०० % टक्के लागला असून सलग नवव्या वर्षी देखील शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ दिल्ली सीबीएसई अंतर्गत इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज १२ रोजी घोषित करण्यात आला. या वर्षासाठी इयत्ता दहावीला ३८ विद्यार्थी प्रविष्ट होते, सर्वच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून त्यापैकी सहा विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले.
शाळेचे अध्यक्ष एल. एच. पाटील, जितेंद्र पाटील, वीरेंद्र पाटील, संचालिका वैशाली पाटील, संचालक कुणाल राजपूत, दिव्यानी राजपूत यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या यशासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पाटील, पूर्व प्राथमिक प्रमुख सुजीता साळुंखे, वर्ग शिक्षक योगेश चव्हाण, दीपक सराफ, श्याम वाजपेयी, राहुल तायडे, सुनील नारखेडे व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. तसेच सर्व पालकांचे देखील अनमोल सहकार्य लाभले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासनातर्फे अभिनंदन करण्यात आले व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.