चोपडा ( प्रतिनिधी ) – धरणगावला राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे चोपडा बसस्थानकातून अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास अटक करण्यात आली आहे.
धरणगाव शहरातील 13 वर्षीय मुलगी कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. 17 फेब्रुवारीरोजी मुलगी चोपडा येथे आई-वडिलांसह आली होती. त्यावेळी संशयित आरोपी दीपक हिरामण पाटील ( रा.संजय नगर धरणगाव ) याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत चोपडा बसस्थानकातून पळवून नेले होते. त्यानंतर गुजरात आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी दीपक हिरामण पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भास्करराव डेरे करीत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला चोपडा शहर पोलिसांनी अटक केली आहे.