जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्यातील शिक्षकांच्या १२ मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हाध्यक्षांनी दिले आहे.
भाजप शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रविण जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात या मागण्या मांडल्या आहेत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा , वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाच्या तारखा तात्काळ घोषित करा , १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशतः अनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे बंद केलेले भविष्य निर्वाह निधीचे खाते तात्काळ सुरू करा , एक तारखेला वेतन देताना वेतनास विलंब करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम व वैद्यकीय प्रतिपूर्तीची रक्कम तात्काळ द्या , परिविक्षाधीन सहाय्यक शिक्षक (शिक्षण सेवक) परिविक्षाधीन शिक्षकेत्तर कर्मचारी (शिक्षकेत्तर सेवक) यांचे मानधन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वाढवा , शिक्षक भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करा , शिक्षकांना व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्री स्तरीय १० , २०, ३० आश्र्वासित प्रगती योजना तात्काळ लागू करा , घोषित , अघोषित व मूल्यांकनास पात्र तुकड्या, शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान द्या , रात्र शाळेतील कर्मचाऱ्यांना १७ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार पूर्णकालिन कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व प्रकारचे लाभ द्या , पायाभूत पदे मंजूर करा अशा मागण्या या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत. संदीप घुगें , दुष्यन्त पाटील, संजय वानखेडे सतिश भावसार, एन आर दाणी, विजय गिरणारे, निळे सर आदींच्याही या निवेदनावर सह्या आहेत.