जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील शनिपेठेत आज गावठी पिस्तुलासह एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि किरणकुमार बकाले यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरुन त्यांनी पोहेकॉ विजयसिंग पाटील, सुधाकर अंबोरे, पोना विजय पाटील , प्रितम पाटील, पोकॉ सचिन महाजन, पंकज शिंदे यांना बातमीची खात्री करण्यासाठी आधी पाठविले बातमीची खात्री झाल्यानंतर
शनिपेठ भागात आंबेडकर नगरमध्ये एका टपरी जवळ आरोपी सागर सुरेश सपकाळे , ( वय-२८ , रा.कोळीपेठ जळगाव ) याच्या ताब्यात एक लोखंडी गावटी बनावटीचे पिस्टल बेकायदेशीरपणे बाळगुन दहशत माजवितांना मिळून आला त्याला ताब्यात घेवुन त्याचेविरुध्द शनिपेठ पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा क.३/२५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.