जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील तांबापूरा भागातील अजमेर गल्लीत पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहूल राजू सोनवणे (वय – २३) रा. शिरसोली नाका, तांबापूरा, जळगाव हा तरूण परिवारासह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. ३ जुलै रोजी रात्री ११ वाजता त्याने त्याची मालकीची (एमएच १९ एटी २४०२) क्रमांकाची दुचाकी तांबापूरात अजमेर गल्लीत पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे ४ जुलै रोजी सकाळी ५ वाजता उघडकीला आले. राहूल सोनवणे याने दुचाकीचा सर्वत्र शोधाशोध केली असता दुचाकी मिळून आली नाही. अखेर सोमवारी ११ जुलै रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे.